Health Tips : केसांच्या आरोग्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे
कढीपत्ता आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनोशेपोटी कढीपत्ता सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही संजीवनी आहे. नियमितपणे आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपली पचनसंस्था नीट काम करत असेल तर शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजनही कमी होते. कढीपत्ता खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, त्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होत नाही. याशिवाय कढीपत्ता खाल्ल्याने आतड्यांना फायदा होतो. त्यामुळे आपले पोट निरोगी राहते. या सर्व गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
रोज कढीपत्ता खाल्ल्याने तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. कढीपत्ता चघळल्याने शरीर डिटॉक्स होते. यामुळे शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. कढीपत्ता कॅलरीज बर्न करते. याशिवाय शरीरावर चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. रोज सकाळी कढीपत्त्याचा रस प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी आणि चयापचय दोन्ही वाढते.
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता सर्वात प्रभावी आहे. कढीपत्ता वजन कमी करण्याचा रामबाण उपाय आहे. यामध्ये अल्कलॉइड्स असतात, ज्यात लठ्ठपणाविरोधी आणि लिपिड-कमी करणारे गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे वजन कमी होते.
कढीपत्ता खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वजन वाढणे आणि वजन कमी करणे या दोन्हीवर परिणाम करते, त्यामुळे कढीपत्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
कढीपत्त्यापासून रस तयार करण्यासाठी कढीपत्त्याची पानं धुवून घ्या. ही पानं एका भांड्यात पाणी घेऊन त्या पाण्यात उकळवा. थोडा वेळ उकळल्यानंतर हे पाणी गाळून प्या. तुम्ही हे पाणी चहासारखे गरम पिऊ शकता. याशिवाय थंड झाल्यावर पानांसह मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याचा रसही सेवन करु शकता. या रसामध्ये मध आणि लिंबाचा रस घालून प्या. हा रस फक्त रिकाम्या पोटी घेतल्यास अधिक परिणामकारक ठरेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.