दिल्लीचा सलग पाचव्या सामन्यात पराभव, काय आहेत फ्लॉप होण्याची कारणे ?
आरसीबीने आज दिल्लीचा 23 धावांनी पराभव केला. हा दिल्लीचा सलग पाचवा पराभव होय.. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. गुणतालिकेत दिल्लीचा संघ तळाशी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण सलामी जोडी होय.. डेविड वॉर्नर याने धावा काढल्या पण स्ट्राईक रेट खूप खराब राहिला.. डेविड वॉर्नर याने फक्त 116 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत.. त्याशिवाय दुसरा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ याला अद्याप दुहेरी धावसंख्या गाठता आलेली नाही. प्रत्येक सामन्यात पृथ्वी फ्लॉप ठरतोय.
दिल्लीच्या मध्यक्रमनेही खराब कामगिरी केली आहे. एकाही फलंजाला मोठी धावसंख्या उभरता आली नाही. मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, यश धुल, मनीष पांडे यांच्यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीच्या पराभवाचे हेही प्रमुख कारण असू शकते.
डेविड वॉर्नर याला प्रभावी नेतृत्व करता आले नाही. दिल्लीच्या पराभवाचे खराब नेतृत्व हेही एक कारण आहे. वॉर्नरने गोलंदाजांचा योग्य वापर केला नाही. कुलदीप यादव याला कधी गोलंदाजी द्यायची, यात वॉर्नरची मोठी चूक होतेय.. गतवर्षी कुलदीपने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या... त्याशिवाय भन्नाट फॉर्मात असलेल्या अक्षर पटेल याला फलंदाजी बढती दिली जात नाही.. अन्यथा तो आणखी धावा जमवू शकेल.
प्रमुख गोलंदाजांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. अक्षर पटेल आणि कुलदीपचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला धावा रोखता आल्या नाहीत. एनरिख नॉर्खिया लयीत दिसत नाही.. याचा फटका दिल्लीला बसत आहे.
ऋषभ पंतची कमी दिल्लीला जाणवत आहे. ऋषभ पंतचे आक्रमक नेतृत्व आणि फलंदाजीची कमी दिल्लीला जाणवतेय.
लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबीने आयपीएलच्या सोळाव्या हंगामात दिल्लीचा पराभव केला.