Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : बीडमधील अरणविहीरा येथे गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे व्हावेत अशी मागणी शेतकरी करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या दोन दिवसांपासून सकाळी कडक ऊन, दुपारी ढग दाटून येत असून सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह तालुक्यातील कुठल्या ना कुठल्या भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट होत आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीने हवालदिल असलेला शेतकरी आणखीन संकटात सापडला असून शनिवारी दुपारी अरणविहिरा परिसरात झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांच्या फळबागा व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलावडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना फटका बसला आहे.
पिंपळगाव घाट, देऊळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट वाया गेले आहेत.
तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका आणि कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या गारपीटीमुळे फार मोठा परिणाम झाला आहे.
या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या भागात हिमाचल प्रदेशात जशी बर्फ वृष्टी होती त्याप्रमाणे सगळीकडे गारपीट झालेली पाहायला मिळत होती.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.