Photos: कोहली-गंभीर यांच्याआधीही आयपीएलमध्ये झालाय राडा

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. हे भांडण यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. पण आयपीएलच्या इतिहासात याआधी अनेकदा राडा झालाय. पाहूयात कोणत्या खेळांडूंमध्ये भांडण झाली ...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठं भांडण पहिल्या हंगामात पाहायला मिळालं. आयपीएलच्या पहिल्याच सीझनमध्ये हरभजन सिंह आणि एस. श्रीसंत यांच्या भांडण झालं होतं. हा वाद इतका वाढला की, हरभजन सिंहने श्रीसंतला भरमैदानात कानशिलात लगावली. यानंतर हरभजन सिंहवर संपूर्ण हंगाम खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.

2014 मध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल मोसमात कायरन पोलार्ड आणि मिचेल स्टार्क यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. पोलार्डने रागाने आपली बॅट जमिनीवर फेकली. यादरम्यान पंचांना मध्यस्थी करून या दोन खेळाडूंमधील वाद मिटवावा लागला होता.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण झालं. पण, या दोघा खेळाडूंमधील बाचाबाचीची ही पहिली वेळ नाही. याआधीही या दोघांचं आयपीएलमध्ये भांडण झालं आहे. आयपीएल 2013 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पहिल्यांदा मैदानावर जोरदार वाद झाला. कोहली आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जात असताना, या दोघांमध्ये बाचाबाची झाली. अखेर मैदानावरीन इतर खेळाडूंना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.
आयपीएल 2012 च्या मोसमात, मुंबई इंडियन्स संघाचा फलंदाज अंबाती रायडूचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज हर्षल पटेलशी जोरदार वाद झाला. यानंतर रायडूला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठाण्यात आला, तर हर्षललाही 25 टक्के दंड ठोठावण्यात आला.
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला. यावेळी सहकारी खेळाडूंनाही त्यांना शांत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.