उन्हाळ्यात शरीराचे संरक्षण करतील 'हे' पदार्थ, नक्की आहारात समावेश करा
दही - दही पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही खावे. यामुळे शरीराचे पचनही चांगले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबूपाणी - उन्हाळा आला की शरीरात पाण्याची कमतरता भासते. अशा परिस्थितीत तुम्ही रोज लिंबूपाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते आणि लिंबातून व्हिटॅमिन सी मिळते. लिंबू पाणी पोटासाठी खूप फायदेशीर आहे.
कोकम सरबत - विशेषतः उन्हाळ्यात तुम्ही कोकम सरबत नक्की प्यावे. कोकम सरबत पचायलाही चांगला असतो. आणि यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो.
ताक - उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी तसेच शरीराला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही दिवसातून किमान दोनदा ताक पिणे आवश्यक आहे. ताक प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच अन्न पचण्सासंही ताकाचा खूप उपयोग होतो.
कैरीचं पन्हं - उन्हाळ्यात शरीराला उष्णतेपासून वाचविण्यासाठी कैरीचं पन्हं नक्की प्या. कैरीचं पन्हं प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटालाही थंडावा मिळतो. कैरीचं पन्हं दिवसातून किमान दोनदा प्यायल्याने तुम्हाला थंडावा मिळेल.
कच्चा कांदा - उन्हाळ्यात कच्चा कांदा जरूर खावा. कच्चा कांदा उन्हाळ्यात पोट निरोगी ठेवतो. कांदा जेवणासोबत सॅलड म्हणून खा. याशिवाय तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर डोक्यावर कच्च्या कांद्याचे तुकडे ठेवून त्यावर जर सुती कापडाने डोके झाकून घेतले तर उन्हापासूनही तुमचे संरक्षण होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.