Tushar Deshpande : दणादण विकेट्स तरी प्रतिस्पर्धी संघाकडून धावांचा पाऊस, तुषार देशपांडेच्या गोलंदाजीमुळे धोनीची चिंता वाढली
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंघाने टॉप 4 मध्ये जागा कायम ठेवली आहे. चेन्नईच्या खेळाडूंची शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी पाहायला मिळत आहे. दरम्यान, एका खेळाडूनं कर्णधार महेंद्र सिंह धोनीची चिंता वाढवली आहे. हा गोलंदाज तुषार देशपांडे (Tushar Deshpande).
तुषारकडे यंदाच्या आयपीएलमध्ये एका मागे एक विकेट मागे विकेट घेत आहे. पण या गोलंदाजानं धोनीला चिंतेत टाकलं आहे. तुषार देशपांडेने विकेट जास्त घेतल्या असल्या, तरी त्याने फलंदाजांनी धावाही भरभरून दिल्या आहे आणि ही बाब संघासाठी चांगली नाही.
पर्पल कॅपच्या यादीत असणाऱ्या तुषार देशपांडेचा इकॉनॉमी रेट सध्या सर्वाधिक आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीतील चेन्नई संघाचा तुषार देशपांडे हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याचा इकॉनॉमी रेट 10 च्या वर आहे.
तुषारचा सध्याचा इकॉनॉमी रेट 11.07 आहे. याचा अर्थ असा की त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये प्रति षटक 11.07 धावा दिल्या आहेत.
ही धावसंख्या टी-20 च्या दृष्टीने खूप जास्त आहे. त्यामुळे विकेट घेताना तुषारला इकॉनॉमी रेटवरही लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्यामुळे कर्णधार धोनीच्या चिंतेतही वाढ झाली आहे.
गुजरात टायटन्स संघाचा मोहम्मद शमीने पर्पल कॅपच्या शर्यतीत मोठी उडी मारली असून तो चेन्नई सुपर किंग्सच्या तुषार देशपांडेसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे.
या दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 17-17 विकेट घेतल्या आहेत. असं असलं तरी सरासरीच्या बाबतीत तुषारच्या गोलंदाजीपेक्षा शमीची गोलंदाजी वरचढ आहे. मोहम्मद शमीचा इकॉनॉमी रेट 7.05 आहे, तर दुसरीकडे तुषारचा इकॉनॉमी रेट 10.77 आहे.
इतकंच नाही तर पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या इतर सर्व खेळाडूंचा इकॉनॉमी रेट 10 च्या खाली आहे. फक्त तुषार देशपांडेचा इकॉनॉमी रेट 10 च्या पुढे आहे.
तुषार देशपांडेने आतापर्यंत आयपीएलमध्ये प्रति षटक 11.07 धावा दिल्या आहेत. टी-20 क्रिकेटसाठी ही आकडेवारी खूप जास्त आहे. त्याने 9 सामन्यात 33.2 षटकात 369 धावा देऊन 19 बळी घेतले आहेत.