IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल
प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्स दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांना प्रत्येक सामन्यात किती पैसे मिळतात? जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या कामगिरीनुसार बोनसही दिला जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी चीअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते.
चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात.
राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात. तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जाते. केकेआर संघाकडून सर्वाधिक 24 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात.
प्रत्येक सामन्याशिवाय चीअरलीडर्सला इतर मानधनही दिले जाते. हे मानधन त्यांच्या कामगिरीच्या आधारवर असते. एखादा संघ जिंकला तर त्यांना बोनस दिला जातो. त्याशिवाय चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ इत्यादींचा लाभ फ्रेंचायझीकडून मिळतो. एखादा संघ फायनलपर्यंत पोहोचला वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिक कमाई करता येते.
आयपीएलमध्ये चीअर लीडर्सचे काम अथवा नोकरी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चीअर लीडर्सला आपले शरीर लवचीक ठेवावे लागते. फक्त डान्स करून चालत नाही तर संघातील खेळाडूंना, चाहत्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचारही त्यांना करावा लागतो.