IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
आयपीएलमधील पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा शेवटचा हंगाम काही खास नव्हता. खराब कामगिरीमुळे संघ बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. हंगाम सुरू होण्यापूर्वी फ्रँचायझीने अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले. रोहितने हार्दिकच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हंगाम खेळला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो. मात्र, अद्याप रोहित आणि फ्रँचायजीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. रोहितने मुंबई इंडियन्स सोडल्यास त्याची जागा संघात कोण घेऊ शकते.
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडल्यास लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल त्याची जागा घेऊ शकतो. गेल्या हंगामात केएल राहुलने 14 सामन्यात 136.12 च्या स्ट्राईक रेटने 520 धावा केल्या होत्या. तो त्याच्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता.
सनरायझर्स हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्माही रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. त्याचा शेवटचा हंगाम खूप चांगला गेला होता. अभिषेकने आयपीएल 2024 मध्ये 16 सामन्यांमध्ये 204.21 च्या स्ट्राइक रेटने 484 धावा केल्या. तो त्याच्या संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माच्या जागी सनरायझर्स हैदराबादच्या राहुल त्रिपाठीचा समावेश होऊ शकतो. गेल्या हंगामात त्याने आपल्या संघासाठी 143.47 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने 6 सामन्यात एकूण 165 धावा केल्या होत्या.
मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्माची जागा मयंक अग्रवालही घेऊ शकतो. गेल्या हंगामात त्याने 4 सामन्यात 112.28 च्या स्ट्राईक रेटने 64 धावा केल्या होत्या.