गोंधळ गडबड नको! सोमवारी फक्त 'या' तीन शेअर्सवर ठेवा नजर, होऊ शकतो भरभक्कम प्रॉफिट
Stocks to Buy Monday: सोमवारीच्या शेअर बाजारातील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. कारण गेल्या काही दिवसांत अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. शुक्रवारी संपूर्ण दिवसात बँकिंग क्षेत्रातील शेअर्सची चांगली मागणी होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशुक्रवारी निफ्टी 32 अंकांनी घसरून 25,356 अंकांवर बंद झाला. तर बीएसई सेन्सेक्स 71 अंकांनी घसरून 82,890 वर स्थिरावला. बँक निफ्टी 165 अंकांनी वधारून 51,938 अंकावर बंद झाला.
असे असताना आता सोमवारी इंडसइंड बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील या तीन शेअर्सकडे सर्वांचे लक्ष असेल. शेअर बाजारातील तज्ज्ञ सुमित बागडिया यांनी वरील तीन शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
इंडसइंड बँक: या शेअरमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तो 1464 रुपयांवर खरेदी करावा. त्यासाठी टार्गेट 1600 रुपये ठेवावे, तर स्टॉप लॉस हा 1400 रुपयांचा राहू द्यावा.
या शेअरने सपोर्ट झोनपासून पुन्हा बाऊन्स केले आहे. हा शेअर 1470 रुपयांपेक्षा वर राहिला तर भविष्यात 1575 रुपये आणि 1600 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
ग्रासिम इंडस्ट्रीज: या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तो 2784.35 रुपयांवर खरेदी करावा. त्यासाठी टार्गेट 3015 रुपये ठेवावे तर स्टॉप लॉस 2675 रुपयांचा लावावा.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)