Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
देशातील पहिली वाहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन गुजरातमधून सुरू होत आहे. आठवड्यातून सहा दिवस सुरु राहील.एक दिवस ही ट्रेन सुरु राहणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअहमदाबाद ते भूज या मार्गावरी ही ट्रेन धावणार असून या ट्रेनचे फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत. प्रवाशांसाठी आरामदायी आणि गतीमान प्रवास देणारी ही ट्रेन आहे.
ट्रेनचं वेळपत्रकही समोर आलं असून वंदे भारत मेट्रो ट्रेन सकाळी 5.05 वाजता भुजहून रवाना होईल, अहमदाबादला सकाळी 10.50 ला पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी 05.30 वाजता सुटेल ती भुजला रात्री 11.10 वाजता पोहोचेल.
वंदे भारत मेट्रो ट्रेन 9 स्थानकावर थांबेल. प्रत्येक स्थानकांवर वंदे भारत मेट्रो 2 मिनिटं असेल. या ट्रेनला दोन्ही शहरांना जोडण्यास पावणे सहा तासांचा वेळ लागेल.
वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या तिकिटाचा कमीत कमी दर 30 रुपये असेल, यावर जीएसटी देखील लागेल. 50 किलोमीटरच्या प्रवासाला 60 रुपये अधिक इतकं शुल्क लागेल. म्हणजेच एका किलोमीटरला 1.20 रुपये लागतील.
या गतीमान ट्रेनमधून प्रवाशांना सुपरफास्ट बसून प्रवास करता येईल, मेट्रो किंवा लोकल ट्रेनचा अनुभव या प्रवासात येईल.
प्रवाशांना बसण्यासाठी मऊ गादीची बैठक व्यवस्था असून उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये पकडण्यासाठी हँडलही दिले आहेत. तसेच, अनाऊंसमेंट आणि डिस्प्लेही या ट्रेनमध्ये दिसून येतात.