Rohit Sharma: मुंबईकरांकडून हिटमॅनचा अनोखा सन्मान, मॅच संपल्यावर रोहितची नीता अंबानी, संजीव गोएंकांशी चर्चा, पुढं काय घडणार?
मुंबई इंडियन्सला यंदाच्या आयपीएलमधील अखेरच्या मॅचमध्ये देखील विजय मिळवण्यात अपयश आलं. या मॅचमध्ये रोहित शर्मानं 68 धावांची खेळी केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोहित शर्मा यावर्षी मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत नव्हता. यावेळी हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी होती.
मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी रोहित शर्मानं चांगली फलंदाजी केली. मुंबईकडून सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार रोहित शर्मानं मारले.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावसंख्या रोहित शर्मानेच केली.
रोहित शर्मा 68 धावांवर बाद झाल्यानंतर वानखेडे स्टेडियम मुंबई येथील प्रेक्षकांनी त्याचा उभं राहून टाळ्या वाजवत सन्मान केला.
रोहित शर्मानं 38 बॉलमध्ये 3 षटकार, 10 चौकारांसह 179 च्या स्ट्राईक रेटनं 68 धावा केल्या.
रोहित शर्माला अखेरच्या मॅचमध्ये गवसलेला फॉर्म टीम इंडियासाठी आयपीएलमध्ये उपयोगी ठरणार आहे. मॅच संपल्यानंतर मुुंबईच्या संघाच्या मालक नीता अंबानी, आकाश अंबानी यांच्याशी रोहित शर्माची चर्चा झाली.
रोहित शर्मा आणि लखनौचे मालक संजीव गोएंका मॅच संपल्यानंतर चर्चा करताना दिसून आले.