IPL 2024 : भारताच्या 'या' अनकॅप्ड युवा खेळाडूंनी मैदान गाजवलं, धमाकेदार कामगिरीच्या जोरावर टीमसाठी ठरले गेमचेंजर
पंजाब किंग्जला शशांक सिंह संघात घ्यायचं नव्हतं मात्र ऑक्शनवेळी झालेल्या गोंधळानंतर 20 लाखात संघात घेतलं होतं. शशांक सिंहच्या खेळीच्या जोरावर पंजाबनं अनेक सामने जिंकले.शशांक सिंहनं 13 मॅचमध्ये 2 अर्धशतकासह 352 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक आक्रमक सलामीची जोडी म्हणून सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड चर्चेत आहेत. अभिषेक शर्मा हा भारताचा अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यानं 201 च्या स्ट्राइक रेटनं 12 मॅचमध्ये 2 अर्धशतकांसह 201 धावा केल्या होत्या.सनरायजर्स हैदराबादनं 6.5 कोटी रुपये अभिषेक शर्माला संघात घेतलं होतं.
रियान पराग राजस्थान रॉयल्ससाठी रनमशीन ठरला आहे.त्यानं 13 मॅचमध्ये 531 धावा केल्या आहेत. रियान परागला 3.8 कोटी रुपयांना राजस्थाननं संघात घेतलं होतं
कोलकाता नाईट रायडर्सकडून हर्षित राणानं दमदार कामगिरी केली. हर्षित राणानं बॉलिंगच्या जोरावर लक्ष वेधलं. 10 मॅचमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत. केकेआरनं 20 लाखांमध्ये त्याला संघात घेतलं होतं.
तुषार देशपांडेनं चेन्नई सुपर किंग्जकडून 17 व्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. तुषार देशपांडेला सीएसकेनं 20 लाख रुपयांना संघात घेतलं होतं. तुषार देशपांडेनं 12 मॅचनंतर 16 विकेट घेतल्या आहेत.