IPL 2024 LSG KL Rahul: संजीव गोयंका अन् केएल राहुलमध्ये काय संभाषण झालं?; संघाच्या प्रशिक्षकांनी जे सांगितले, ते ऐकून डोक्यावर हात माराल!
IPL 2024 LSG KL Rahul: लखनौ सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) यांच्यातील मॅचनंतर केएल राहुल (KL Rahul) आणि संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्यात वाद झाला होता. (image credit-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौ सुपर जाएंटसचे मालक संजीव गोयंका यांनी सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर केएल राहुलला ऑन कॅमेरा जाब विचारला होता. यावरुन संजीव गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. या वादाचे पडसाद अद्याप उमटत आहेत.(image credit-IPL)
लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लूसनर यांनी कर्णधार केएल राहुलबद्दल भलतीच प्रतिक्रिया दिली आहे. दोन क्रिकेट प्रेमींमधील हे सामान्य संभाषण होते. राहुलच्या कर्णधारपदाबाबतही ते बोलले, असं क्लूसनर यांनी सांगितले. (image credit-IPL)
क्लुसनर म्हणाले, मला वाटते की हे दोन क्रिकेट प्रेमींमधील संभाषण होते. आम्हाला ठोस संभाषण करायला आवडते. मला यात काही अडचण दिसत नाही. अशा संभाषणामुळे संघ अधिक चांगला होतो. (image credit-IPL)
आमच्यासाठी ही कोणत्याही प्रकारे मोठी गोष्ट नाही. राहुल चांगल्या ठिकाणी असून गेल्या अनेक सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे, असंही क्लुसनर यांनी सांगितले.(image credit-IPL)
लखनौने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. या कालावधीत संघाने 6 सामने जिंकले असून 6 सामने गमावले आहेत. लखनौचे 12 गुण आहेत. (image credit-IPL)
आता लखनौचे दोन सामने बाकी आहेत. लखनौचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. यानंतर त्याचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना 17 मे रोजी होणार आहे.(image credit-IPL)
केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात-क्रिकबझवर चर्चा करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, ते सगळे उद्योगपती आहेत आणि त्यांना फक्त नफा-तोट्याची भाषा कळते. पण इथे तोटा नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे? ते 400 कोटींचा नफा कमावत आहेत आणि हा असा व्यवसाय आहे जिथे त्यांना काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल कारण परिणाम काहीही असो, त्यांना नफा मिळतो. मालकाचे काम असे असले पाहिजे की जेव्हा तो पत्रकार परिषदेत किंवा ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटतो तेव्हा त्याने त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सेहवागने सांगितले. (image credit-IPL)
केएल राहुल लखनौ सोडणार का?- व्हायरल व्हिडिओमध्ये केएल राहुल संजीव गोयंका यांच्यासमोर उभं राहून सर्व काही ऐकत होता. अशा परिस्थितीत लोक असा अंदाज लावू लागले की केएल राहुल आयपीएल 2024 नंतर लखनौ सुपर जायंट्स सोडू शकतात. याशिवाय, लीग टप्प्यातील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये राहुल कदाचित LSG चे नेतृत्व करणार नसल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात राहुलने 33 चेंडूत 29 धावा केल्या होत्या.(image credit-IPL)