Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
मुंबईत वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावासामुळे जनजीवन काही तासांसाठी विस्कळीत झालं होतं. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघाटकोपर परिसरात पेट्रोल पंवावर एक बॅनर पडल्यामुळे मोठी दाणादाण उडाली, या बॅनरखाली काही गाड्या अडकल्याने त्यांचं नुकसान झालं आहे.
वादळी वाऱ्याच्या जोरामुळे वडाळा परिसरात टॉवर कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अडकलेल्या दोन ते तीन जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
येथील टॉवरखाली अडकलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. टॉवर दुर्घनटेनंतर अग्निशमन दलाने लगेचच घटनास्थळी धाव घेतली होती
दरम्यान, या दुर्घटनेत एक जण जखमी असून गाडीतून काढण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात आला.
दरम्यान, सोसाटच्या वारा आणि पडलेल्या मुसळधार पावसात जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी नाका शाखेजवळील मोठे माडाचे झाड कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले.
नवी मुंबईतील ऐरोली परिसरात हायटेन्शन वीज वाहिनीच्या टॅावरवर स्पार्कींग होऊ आग लागल्याची घटना घडलीय. वादळी वाऱ्यामुळे येथील टॅावरने पेट घेतला. त्यामुळे, ऐरोली,दिघा परिसरात वीजपुरवठा खंडीत झाला होता