IPL 2024: अलविदा...! 10 खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा दिसणार नाही?; 2024 चा हंगाम शेवटचा ठरण्याची शक्यता
आयपीएल 2024 च्या हंगामात अनेक दिग्गजांना आयपीएलमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही. अशा स्थितीत तो पुढील हंगामापूर्वी निवृत्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (image credit-IPL)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. आयपीएल 2024 मध्ये, एमएस धोनीने 220.55 च्या स्ट्राइक रेटने 161 धावा केल्या आहेत.(image credit-IPL)
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आर अश्विनही आयपीएलला अलविदा म्हणू शकतो. अश्विनने या मोसमात फलंदाजी करताना 86 धावा केल्या. त्याचबरोबर त्याने 15 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.(image credit-IPL)
यावेळी शिखर धवनला पंजाब किंग्जकडून जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. या हंगामात त्याने 5 सामने खेळले, ज्यात त्याने 30.40 च्या सरासरीने 152 धावा केल्या. हा हंगाम त्याचा शेवटचा असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.(image credit-IPL)
केकेआरचा नितीश राणा या मोसमात फक्त दोनदा फलंदाजीला आला. नितीशने 2 सामन्यात 42 धावा केल्या.(image credit-IPL)
या वर्षी डेव्हिड वॉर्नरही काही विशेष कामगिरी करू शकला नाही. पुढील वर्षी कदाचित तो आयपीएलमध्ये दिसणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे.(image credit-IPL)
गुजरात टायटन्ससाठी ऋद्धिमान साहाचा हा शेवटचा हंगाम असू शकतो. ऋद्धिमानची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिली आहे.(image credit-IPL)
पुढील मोसमात मोहित शर्माही निवृत्ती घेऊ शकतो. मोहितने यावर्षी 12 सामने खेळले असून त्यात त्याने 13 विकेट घेतल्या आहेत.(image credit-IPL)
दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. कार्तिकने आयपीएल 2024 च्या 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या. या कालावधीत 2 अर्धशतके झळकावली.(image credit-IPL)
पियुष चावलाने या मोसमात 11 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. पीयूष पुढील हंगामापूर्वी निवृत्ती घेऊ शकतो.(image credit-IPL)
अमित मिश्राला आयपीएल 2024 मध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. या मोसमात त्याने दोन षटकात 20 धावा देऊन 1 बळी घेतला. अमित मिश्रा पुढील हंगामापूर्वी निवृत्त होऊ शकतो.(image credit-IPL)