अनसूया सेनगुप्ताला अभिनयात नाही तर या क्षेत्रात करिअर करायचे होते, ऑडिशनसाठी मेसेज आल्यावर तिने मेकरला विचारला हा अजब प्रश्न!
अनेक स्टार्स कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत. यावेळी स्पर्धेत भारतीयांचाच दबदबा पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, कोलकाता मध्ये राहणारी अनुसया या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.
बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शेमलेस' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
कोलकातास्थित अनसूया पहिल्यांदा प्रकाशझोतात आली जेव्हा तिने नेटफ्लिक्स शो 'मसाबा मसाबा'चा सेट डिझाइन केला.
प्रोडक्शन डिझायनर आणि आता अभिनेत्री म्हणून तिने आपला ठसा उमटवला आहे.
यासोबतच कान्स फेस्टिव्हलमध्ये भारतीय वंशाचा मंथन हा चित्रपटही दाखवण्यात आला होता.
अनुस्याच्या विजयाचा आनंद साजरा करताना अनेक बडे सेलिब्रिटी तिचे अभिनंदन करत आहेत.
अनसूया सेनगुप्ताने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठातून पूर्ण केले आहे, तेथून तिने इंग्रजी साहित्यात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आज जरी अनसूयाने तिचे अभिनयाचे पराक्रम जगासमोर सिद्ध केले असून रातोरात ती संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली असली तरी तिला पत्रकार व्हायचे होते.