IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स... यंदाच्या आयपीएल हंगामाचा विजेता ठरला शाहरुखचा संघ, तिसऱ्यांदा कोरलं चषकावर नाव
हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण या धावांचं आव्हान अगदी लिलया पेलत या संघाने यंदाच्या आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे.
कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेट आणि 57 धावांनी पराभव केला.
हैदराबादने कोलकात्यासमोर अवघ्या 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
यंदाच्या विजयासह कोलकात्याने तिसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.
आधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकात्याने चषकावर नाव कोरले होते.
संघाचा मालक शाहरुख देखील आजारपणानंतर त्याच्या संघासाठी सामना पाहायला मैदानावर पोहचला होता.
कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.