Virat Kohli New Tattoo : विराट कोहलीचा अध्यत्माला जोडणारा नवा टॅटू...
आरसीबीचा (Royal Challenegers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहलीने हातावर नवीन टॅटू काढलाय. (Photo : Aliens Tattoo)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा टॅटू काढण्यासाटी आर्टिस्टला तब्बल 14 तास लागले. टॅटू काढणाऱ्या आर्टिस्टच्या मते, 'हा टॅटू विराट कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू दर्शवतो. (Photo : Aliens Tattoo)
विराट कोहलीच्या टॅटूला क्रीडा चाहते पसंती दर्शवतात. विराट कोहलीच्या या नव्या टॅटूलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. (Photo : Aliens Tattoo)
चाहत्यांना विराट कोहलीचा हा नवीन टॅटू आवडला आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे. (Photo : Aliens Tattoo)
विराट कोहलीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे अनेक दिवसांपासून टॅटू काढता आला नाही. गेल्या महिन्यात विराट कोहलीने टॅटू काढण्यास सांगितले. (Photo : Aliens Tattoo)
विराट कोहलीला आपला जुना टॅटूसोबत नवीन टॅटू जोडायचा होता. नवीन टॅटूमधून अध्यात्माची झलक दिसावी, अशी विराट कोहली इच्छा होती. (Photo : Aliens Tattoo)
अध्यत्माला जोडणारा टॅटू करण्याची विराट कोहलीची इच्छा होती. जे सर्व गोष्टींच्या परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करेल आणि स्वतः निर्मितीचा स्त्रोत असेल. (Photo : Aliens Tattoo)
काहीतरी जे उदात्तता आणि ऐक्य, जीवनाची रचना, सर्वांचा स्रोत दर्शवेल, असा विराट कोहलीला टॅटू हवा होता. (Photo : Aliens Tattoo)
भानुशाली म्हणाला की, विराट कोहलीसाठी नवीन टॅटू खूप महत्वाचा होता. हातावर असलेल्या टॅटूसोबत नवीन टॅटू काढायचा होता. त्यासाठी मला पूर्ण क्षमतेने काम करावे लागले. (Photo : Aliens Tattoo)
तसेच काळजी घ्यावी लागली. टॅटू काढण्यासाठी 14 तासांचा कालावधी लागला. या कालावधीत स्टूडिओ पूर्णपणे बंद होता. (Photo : Aliens Tattoo)
तसेच सर्व सुरक्षेची काळजी घेतली. सीआरफीएफचे सैनिक स्टुडिओबाहेर होते. विराट कोहली टॅटूच्या प्रक्रियेत मग्न झाला होता. (Photo : Aliens Tattoo)
. टॅटू पूर्ण झाल्यानंतर विराटने आश्चर्याने नवीन टॅटूकडे पाहिले. यावरुन टॅटू कलाकाराने असा निष्कर्ष काढला की त्याला माहित होते की हा टॅटू आयुष्यभर त्याच्यासोबत असेल. (Photo : Aliens Tattoo)