Mahabaleshwar Weather : वेण्णा लेक, महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात पर्यटक गारठले...
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशातच आता सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.
महाबळेश्वरसह (Mahabaleshwar) वेण्णा (Venna) लेक परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. अचानक तिथला पारा घसरला आहे
वेण्णा लेकमध्ये तापमानाचा पारा सहा अंशावर तर महाबळेश्वरचा पारा नऊ अंशावर गेला आहे.
दरम्यान, अचानक तापमानाचा पारा घसरल्यामुळं पर्याटकांसह स्थानिकही चांगलेच गारठले आहेत. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याचा अनुभव येत आहे.
दरम्यान, एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat wave) शक्यता भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिली आहे.
एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.