गुरबाजच्या खेळीवर विजय शंकरचे अर्धशतक भारी, गुजरातने कोलकात्याचा केला पराभव
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने कोलकात्याचा सात विकेटने पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्याने दिलेले 180 धावांचे आव्हान गुजरातने 13 चेंडू आणि सात विकेट राखून पार केले.
विजय शंकर याने वादळी अर्धशतकी खेळी केली. त्याशिवाय शुभमन गिल आणि डेविड मिलर यांनी निर्णायाक योगदान दिले. कोलक्याताकडून एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
कोलकात्याने दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या सलामी फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. 4 षटकात 41 धावांची भागिदारी केली. साहा आणि गिल यांनी आक्रमक सुरुवात करुन दिली.
साहा याला 10 धावांवर रसेल याने तंबूत धाडले. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि गिल यांनी गुजरातच्या डावाला आकार दिला. हार्दिक पांड्या याने संयमी फलंदाजी केली तर गिल याने धावांचा पाऊस पाडला.
हार्दिक पांड्या 26 धावांवर बाद झाला. या खेळीत हार्दिक पांड्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावले. हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिलही लगेच तंबूत परतला. शुभमन गिल 49 धावांवर बाद झाला.
गिल बाद झाल्यानंतर गुजरातचा संघ अडचणीत सापडेल असे वाटले होते. पण विजय शंकर आणि डेविड मिलर यांनी गुजरातला विजय मिळवून दिला.
विजय शंकर याने वादळी अर्धशतक झळकावले. विजय शंकरला डेविड मिलर याने चांगली साथ दिली. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. विजय शंकर याने 24 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. तर डेविड मिलर याने 18 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. या छोटेखानी खेळीत मिलर याने 2 चौकार आणि 2 षटकार लगावले.
कोलकात्याकडून ह्रतेश राणा, रसेल आणि सुनील नारायण यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. सुयेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, नीतीश राणा यांची पाटी कोरी राहिली.