जोसचा जोश अन् चहलची फिरकी, राजस्थानचा हैदराबादवर 72 धावांनी विजय
राजस्थानने पहिल्याच सामन्यात हैदराबादचा दारुण पराभव केला. संजू सॅमसन, जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या विस्फोटक फलंदाजीनंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यजुवेंद्र चहलने चार विकेट घेतल्या. त्यामुळे राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 131 धावांपर्यंत पोहचला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्या फलंदाजीमुळे हैदराबदाच्या संघाने 100 धावसंख्या ओलांडली. अबुद्ल समद याने नाबाद 32 धावांची खेळी केली. तर उमरान मलिक याने 19 धावांचे योगदान दिले. समदचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 ची धावसंख्या ओलांडता आली नाही.
राजस्थानने दिलेल्या 204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात खराब झाली. शून्य धावसंख्या असताना हैदराबादचे दोन फलंदाज बाद झाले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडता आले नाही. 50 धावांच्या आत अर्धा हैदराबादचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मयांक अग्रवाल 27, हॅरू ब्रूक 13, वॉशिंगटन सूंदर 1, ग्लेन फिलिप्स 8 आणि अदिल रशिद 18 यांना मोठी खेळी करता आली नाही.
वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ड याने भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. बोल्टने अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना खातेही उघडू दिले नाही. बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे दोन्ही फलंदाजांनी नांगी टाकली. अभिषेक शर्मा त्रिफाळाचीत बाद झाला. तर राहुल त्रिपाठीलाही बोल्टचा चेंडू समजला नाही. बोल्टचा चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन गेला... स्लीपमध्ये उभा असलेलेल्या जेसन होल्डर याने हवेत झेपवत अप्रतिम झेल घेतला. बोल्टने पहिल्याच षटक निर्धाव फेकत हैदराबादच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. ट्रेंट बोल्ट याने पावरप्लेमध्ये तीन षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने एक षटक निर्धाव टाकत दोन विकेट घेतल्या. बोल्टने तीन षटकात अवघ्या आठ धावा देत हैदराबादला बॅकफूटवर ढकलले.
बोल्टसह इतर गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. केएम आसिफ, जेसन होल्डर, रविचंद्र अश्विन, यजुवेंद्र चहल यांनी भेदक मारा केला. युजवेंद्र चहल याने सर्वाधिक चार विकट घेतल्या. तर जेसन होल्डर आणि अश्विन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. तर बोल्टला दोन विकेट मिळाल्या.
दरम्यान, हैदराबादचा कर्णधार भुवनेश्वर कुमार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकाच्या बळावर राजस्थानने निर्धारित 20 षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात 203 धावांचा डोंगर उभारला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर याने धावांचा पाऊस पाडला होता. यंदाही पहिल्याच सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. जोस बटलर याने हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. बटलरपुढे हैदराबादच्या गोलंदाजाची दयनीय अवस्था झाली होती. जोस बटलर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने सुरुवातीपासूनच हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भुवनेश्वर कुमार, फारुकी, वॉशिंगटन सुंदर, नटराजन यांचा त्याने समाचार घेतला. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांची खेळी केली. फारुकीने अप्रितिम चेंडूवर जोस बटलरला त्रिफाळाचीत बाद केले. जोस बटलर याने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान तीन षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. बटलरने पावर प्लेच्या षटकाचा फायदा घेत धावांचा पाऊस पाडला.
बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी अवघ्या 5.5 षटकात 85 धावांची सलामी दिली. यामध्ये जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांचे योगदान दिलेय. पहिल्या विकेटसाठी बटलर आणि जयस्वाल यांनी 85 धावांची भागिदारी केली. जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फटकेबाजीपुढे हैदराबादची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. या दोघांच्या विस्फोटक फंलदाजीमुळे राजस्थानने पहिल्या सहा षटकात 85 धावांचा डोंगर उभारला. पावरप्लेमधील ही राजस्थानची सर्वाधिक धावसंख्या आहे. जोस बटलर याने 22 चेंडूत 54 धावांच योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल याने 13 चेंडूत 30 धावांचे योगदान दिले.
यशस्वी जयस्वाल याने दमदार अर्धशतक झळकावले. जयस्वाल याने 37 चेंडूत 54 धावांची खेळी केली. एका बाजूला जोस बटलर आणि संजू सॅमसन विस्फोटक फलंदाजी करत होते, तेव्हा दुसऱ्या बाजूला यशस्वीने संयमी फलंदाजी केली. यशस्वीने 54 धावांच्या खेळीमध्ये 9 चौकार लगावले. फारुकीने यशस्वीची खेळी संपुष्टात आणली. यशस्वीने जोस बटलरसोबत पहिल्या विकेटसाठी 35 चेंडूत 85 धावांची भागिदारी केली. तर संजूसोबत दुसऱ्या विकेटला 40 चेंडूत 54 धावा जोडल्या.
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्यानंतर संजू सॅमसन यानेही अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसन याने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन याने हैदराबादची गोलंदाजी फोडून काढली. नटराजन याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन बाद झाला. अभिषेक शर्मा याने सिमारेषावर संजूचा अप्रतिम झेल घेतला. संजू सॅमसन याने 32 चेंडूत 55 धावांची भागिदारी केली. या खेळीदरम्यान संजू सॅमसन याने चार षठकार आणि तीन चौकार लगावले.