Girish Bapat : पुण्यात पोटनिवडणूक होणार? भाजपकडून पाच नावं चर्चेत, कोणाला मिळणार उमेदवारी?
खासदार गिरीश बापट यांच्या (Girish bapat) निधनांनतर रिक्त जागी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली तर उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार? याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यात आता भाजपकडून निवडणुकीसाठी काही प्रमाणात तयारी सुरु झाली आहे.गिरीश बापटांच्या जागी उमेदवार म्हणून पाच नावांची चर्चा आहे. त्या पाचही जणांनी पुण्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहे. त्यात पहिलं नाव मुरलीधर मोहोळांचं आहे.
त्यानंतर मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे.
बापट यांच्या सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
भाजप नेते संजय काकडेंचंही नाव चर्चेत आहे.
भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाची चर्चा आहे.
बापट यांचा मुलगा गौरव बापट आणि सून स्वरदा बापट यांच्यापैकी मुलगा राजकारणात सक्रिय नाही त्यामुळे स्वरदा यांच्या नावाची जास्त चर्चा आहे.