दिल्लीच्या पराभवाचा चौकार, अखेरच्या चेंडूवर मुंबईने मिळवला विजय

IPL 2023, DC vs MI : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावांचे योगदान दिले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढून दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय होय.. तर दिल्लीचा हा सलग चौथा पराभव होय.

रोहित शर्मा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. पहिल्या चेंडूपासून रोहित शर्मा याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले.
रोहित शर्मा याने सुरुवातीला ईशान किशन याच्यासोबत 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर तिलक वर्मा याच्यासोबतही अर्धशतकी खेळी केली.
तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. रोहित शर्माला साथ देताना तिलक वर्मा याने चौकार आणि षटकार लगवाले. तिलक वर्मा याने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. तिलक वर्मा याने रोहित शर्मासोबत महत्वाच्या क्षणी अर्धशतकी भागादारी करत धावसंख्या वाढवली. तिलक वर्मा याने मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला.
ईशान किशन यानेही दमदार फलंदाजी केली. तो दुर्देवीरित्या धावबाद झाला. ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावांची सलामी दिली. ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अद्याप सूर्यकुमार यादव याची बॅट शांतच आहे. सलग तिसऱ्या सामन्यात सूर्याला स्वस्तात बाद झाला. सूर्यकुमार यादव आज गोल्डन डकचा शिकार झाला. सूर्यकुमार यादव याला मुकेश कुमार याने तंबूचा रस्ता दाखवला.
लागोपाठ विकेट पडल्यानंतर टिम डेविड-कॅमरुन ग्रीन यांनी सयंमी आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी 19 चेंडूत 30 धावांची भागिदारी करत मुंबईला विजय मिळवून दिला. टिम डेविड याने 13 धावांची खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने 8 चेंडूत 17 धावांची खेळी केली.
173 धावांचा बचाव करताना दिल्लीच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. सुरुवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजांनी धावा केल्या. मुकेश कुमार याच्या षटकात विकेट पडल्यानंतर दिल्लीने पुनरागमन केले होते. पण विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. मुकेश कुमार याने दोन विकेट घेतल्या. मुस्तफिजुर रहमान याने एक विकेट घेतली. इशान किशन धावबाद झाला.
IPL 2023, DC vs MI : मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर दिल्लीचा डाव 172 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीला 20 षटके फलंदाजीही करता आली नाही. पीयुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ या दोघांनी दिल्लीच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवले. तर रिले मेरेडिथ याने दोन विकेट घेतल्या.