LSG vs SRH : हैदराबादचा सलग दुसरा पराभव, लखनौचे नवाब पडले भारी
LSG vs SRH, Match Highlights: कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनराजयर्स हैदराबादचा पाच विकेटने पराभव केला. लखनौच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना 121 धावांपर्यंत रोखले, त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले. लखनौने हैदराबादचा पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृणाल पांड्या याने आधी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली, त्यानंतर फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. लखनौचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय होय. तर हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. एडन मार्करमचे नेतृत्वही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाही. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
हैदराबाद विरोधात कृणाल पांड्या याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने चार षटकात फक्त 18 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर फलंदाजीत त्याने 34 धावांचे योगदान दिले. कृणाल पांड्याने 23 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 34 धावांचे योगदान दिले.
दोन सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर राहुलने आज कर्णधाराला साजेशी खेळी केली. लो स्कोरिंग सामन्यात राहुलने 35 धावांचे योगदान दिले. 31 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने राहुलने 35 धावांची खेळी केली.
भन्नाट फॉर्मात असणाऱ्या काइम मायर्स याला आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 14 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले. दीपक हुड्डा सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला. त्याने सात धावांचे योगदान दिले. रुदर्स शेफर्ड याला खातेही उघडता आले नाही.
कृणाल पांड्या बाद झाल्यानंतर लखनौची फलंदाजी कोलमडली होती. एकापाठोपाठ विकेट गेल्या होत्या. त्यावेळी निकोलस पूरन मार्कस स्टॉयनिस संयमी फलंदाजी करत विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने 10 आणि पूरन याने 11 धावांचे योगदान दिले.
लो स्कोरिंग सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. वॉशिंगटन सुंदर, एडन मार्करम, नटराजन यांना विकेट घेता आली नाही. उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार यांनी एक एक विकेट घेतली, पण धावा खर्च केल्या. आदिल रशिद याने दोन विकेट घेतल्या. फारुकी याने 3 षटकात अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने 13 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित 20 षटकात हैदराबादने 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. हैदराबादच्या तीन फिरकी गोलंदाजांनी हैदराबादच्या सहा गड्यांना तंबूत पाठवले. कृणाल पांड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली.
कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. मयंक अग्रवाल अवघ्या 8 धावा काढून तंबूत परतला. एडन मार्करम याला खातेही उघडता आले नाही. हॅरी ब्रूक 3, वॉशिंगटन सूंदर 16,आदिल रशीद 4, अमरान मलिक शून्य.. यांना मोठी खेळी करता आली नाही. लखनौच्या गोलंदाजीसमोर फलंदाजींनी नांगी टाकली.