Ambabai : डोळ्याचे पारणे फेडणारा अंबाबाईचा रथोत्सव; पाहा ड्रोनमधून टिपलेली सोहळ्याची भव्यता
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव अलोट गर्दीत पार पडला. यावेळी मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवस्थान समितीने साकारलेल्या नवीन सागवानी रथातून सोहळा पार पडला.
रथावरील चांदीचे नक्षीकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही, पण विद्युत रोषणाईने रथ देखणा दिसत होता.
देवीची आरती झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन रथोत्सव सोहळ्याला प्रारंभ झाला.
पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आदींच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरुवात झाली.
महाद्वार, गुजरी आणि भवानी मंडपादरम्यान देवीचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
फुलांच्या वर्षावात भाविकांनी देवीचे स्वागत केले.
बिनखांबी गणेश मंदिरमार्गे रथ पुन्हा मंदिरात आल्यानंतर या सोहळ्याची सांगता झाली.
रथोत्सव मार्गावर आकर्षक रांगोळ्या व फुलांचा सडा सजवण्यात आला होता.
अंबाबाईची महती समजण्यासाठी जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.