IPL 2023, KKR vs SRH : कोलकात्यासाठी रिंकू पुन्हा आला धावून, अखेरच्या चेंडूवर मारला चौकार
IPL 2023, KKR vs SRH: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकात्याने थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात सहा धावांची गरज असताना अर्शदीप याने भेदक मारा केला.. पण रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. दोन चेंडूत दोन धावांची गरज असताना आंद्रे रसेल धावबाद झाला.. त्यामुळे रिंकूवर दबाव होता.. पण रिंकूने दबाव न घेता अर्शदीपच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत पंजाबला पराभवाची चव चाखायला लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 179 धावांपर्यंत मजल मारली होती. पंजाबने दिलेल्या 180 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पाच विकेट राखून पार केले.
कोलकात्याकडून कर्णधार नीतीश राणा याने अर्धशतकी खेळी केली. तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंह यांनी वादळी फलंदाजी करत कोलकात्याला विजय मिळवून दिला.
पंजाबने दिलेले 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात अश्वासक झाली. गुरबाज आणि जेसन रॉय यांनी दमदार फलंदाजी केली. पण गुरबाजला बाद करत एलिसने इम्पॅक्ट पाडला. गुरबाज बाद झाल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने जेसन रॉय याच्यासोबत कोलकात्याचा डाव सावरला. गुरबाजने एक षटकार आणि एका चौकारासह 15 धावांचे योगदान दिले. जेसन रॉय आणि नीतीश राणा यांनी कोलकात्याच्या डावाला आकार दिला.
जेसन रॉय याला 38 धावांवर हरप्रीत ब्रार याने तंबूत पाठवले. जेसन रॉय याने आठ चौकाराच्या मदतीने 38 धावांचे योगदान दिले. जेसन रॉय बाद झाल्यानंतर वेकंटेश अय्यर यालाही मोठी खेळी करता आली नाही. चहरने अय्यरला 11 धावांवर तंबूत पाठवले. अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याचा डाव ढेपाळला. नीतीश राणाही बाद झाला.
नीतीश राणा याने कर्णधाराला साजेशी खेळी केली. नीतीश राणा याने 38 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. रामा याने या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. नीतीश राणा बाद झाल्यानंतर आंद्रे रसले याने स्वर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. आंद्रे रसेल याने रिंकूच्या साथीने कोलकात्याला विजायाकडे नेले.
अखेरच्या षटकात दोन चेंडूवर दोन धावांची गरज असताना रसेल धावबाद झाला. रसेल याने 23 चेंडूत तीन षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 42 धावांचे योगदान दिले. रसेल बाद झाल्यानंतर रिंकूने चौकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. रिंकूने 10 चेंडूत एक षटकार आणि दोन चौकार लगावत विजयी खेळी केली. रिंकू सिंह पुन्हा एकदा कोलकात्याच्या मदतीला धावून आला.
पंजाबकडून राहुल चहर याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवा नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. इतर गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही.