Virat Kohli : पराभवानंतर विराटचा पारा चढला; सहकाऱ्यांवर भडकला, म्हणाला...
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीने नाणेफेक जिंकली आणि संघ गोलंदाजीसाठी उतरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 179 धावा करता आल्या.
कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. दरम्यान, कोहलीची ही खेळी व्यर्थ ठरली. सामन्यातील परभावानंतर कोहलीने प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त केली.
कोहली यावेळी म्हणाला की, ''आम्ही सामन्यात अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ केला नाही. त्यामुळे आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत. आम्ही विरोधी संघाला विजयाची संधी दिली.''
''आमच्या संघाला सामन्यात मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. आम्ही अनेक सोपे झेल सोडले, ते आम्हाला महागात पडले. यामुळे आम्हाला आणखी 25-30 धावांचा पाठलाग करावा लागला.''
''याशिवाय आमचे फलंदाज सतत बाद होत राहिल्या त्यामुळे आम्हांला लक्ष्य गाठता आलं नाही. केवळ एका चांगल्या भागीदारीमुळे सामन्याचा मार्ग बदलता आला असता, पण तसं झालं नाही.''
कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला.
केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सामन्यांत तीन विजय मिळवला असून पाच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.