Rain : भंडारा जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यात जोरदर अवकाळी पाऊस
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rain) हजेरी लावली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच या पावसामुळं शेती पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे.
अवकाळी पावसामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील भात पिकांसह, मका, पालेभाज्या, वेलवर्गीय पिकं, आंबा, बागायती शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी पुरता हतबल झाला आहे. अनेक ठिकाणी शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.
भंडारा जिल्ह्यातील रात्रीपासून जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस झाला
अवकाळी पावसाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. झाडावरचे आंबे गळून पडले आहेत.
राज्यातील अनेक भागात गारपीट झाली आहे. यामुळं शेतात काढणी केलेल्या पिकांना फटका बसला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं केली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी केलीचं पिक जमिनदोस्त झालं आहे.
आजही राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.