Mohammed Siraj : मोहम्मद सिराजचा अनोखा विक्रम, अशी 'विराट' कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

यंदाच्या आयपीएल हंगामात सिराजने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात सिराज पहिल्या क्रमांकावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
याशिवाय सिराज याने आयपीएलमध्ये अनोखं शतक झळकावलेय. यंदाच्या आयपीएलमध्ये सिराज याने १०० पेक्षा जास्त चेंडू निर्धाव फेकले आहेत. असा पराक्रम करणारा सिराज एकमेव गोलंदाज आहे.

पावरप्लेमध्ये सिराजच्या गोलंदाजीवर धावा काढणे प्रतिस्पर्धी फलंदाजांना कठीण जातेय. सिराजने आतापर्यंत ३० षटके गोलंदाजी केली असून यामधील अर्धे चेंडू त्याने निर्धाव फेकले आहेत.
मोहम्मद सिराज याने आंद्रे रसेल याचा त्रिफाळा उडवत पर्पल कॅपवर कब्जा मिळवला. कोलकात्याविरोधात सिराजने चार षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.
सिराजने यंदाच्या हंगामात भेदक मारा करत पर्पल कॅवर कब्जा मिळवलाय. सिराजने आठ सामन्यात १४ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खान याने सात सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत. तर अर्शदीपने सात सामन्यात १३ विकेट घेतल्या आहे. तो तिसऱ्या क्रमांकार आहे.
युजवेंद्र चहलने १२ विकेट घेतल्या आहेत. तुषार देशपांडे याच्या नावावरही १२ विकेट आहेत. आघाडीच्य पाच वेगवान गोलंदाजात चार भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये मोहम्मद सिराज याने सर्वांनाच प्रभावित केलेय. पावरप्लेमध्ये विकेट घेण्यासोबतच निर्धाव चेंडू टाकण्याचं कामही सिराजने चोख बजावलेय.
मोहम्मद सिराज याने पर्पल कॅपवर कब्जा मिळवलाय. सिराजने विकेट तर घेतल्या आहेत. त्याशिवाय यंदाच्या हंगामात सर्वाधिक निर्धाव चेंडू फेकण्याचा पराक्रम सिराज याने केला आहे.
आठ सामन्यात सिराजने आतापर्यंत १०० चेंडू निर्धाव फेकले आहेत. सिराजच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. नेटकरी सिरजावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.