गुजरातचा हल्लाबोल! राजस्थानला नऊ विकेटने हरवले
IPL 2023, RR vs GT: आधी गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना जेरीस आणले, त्यानंतर फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. साघिंक खेळाच्या बळावर गुजरातने राजस्थानचा नऊ विकेटने पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह गुजरातने पराभवाचा वचपा काढला. लीग फेरीत पहिल्या सामन्यात राजस्थानने गुजरातचा पराभव केला होता. राजस्थानने दिलेल्या 119 धावांचे माफक आव्हान गुजरातने नऊ विकेट आणि 37 चेंडू राखून सहज गाठले.
गुजरातचा या स्पर्धेतील हा सातवा विजय होय. या विराट विजयासह गुजरातने प्लेऑफच्या दिशेन पाऊल टाकलेय.
119 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरुवात दिली. पहिल्या तीन षटकात गिल-साहा जोडीने सावध फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेत गुजरातची धावसंख्या वाढवली.
गुजरातने पावरप्लेमध्ये बिनबाद 49 धावा चोपल्या होत्या. इथेच गुजरातचा विजय निश्चित झाला होता. साहा आणि गिल यांनी ताबोडतोड धावा करत गुजरातच्या धावसंख्येला आकार दिला. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 71 धावांची भागिदारी केली.
शुभमन गिल याला चहल याने बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.. पण तोपर्यंत उशीर झाला होता.
शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या याने गुजरातची धावसंख्या वेगाने वाढवली. साहा याच्या मदतीने हार्दिक पांड्या याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
हार्दिक पांड्याने अवघ्या 15 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावांची खेळी केली. तर वृद्धीमान साहा याने नाबाद 41 धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहल याने एकमेव विकेट घेतली.