,Reheating Food: 'या' गोष्टी पुन्हा गरम करुन कधीही खाऊ नका
बटाटा: बटाट्यापासून बनवलेले अन्न पुन्हा गरम केल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बटाटा पुन्हा गरम केल्याने त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम बॅक्टेरिया विकसित होऊ लागतात, ज्यामुळे बोट्युलिझम रोग होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा रोग पाठीचा कणा, मज्जातंतू आणि मेंदूवर हल्ला करतो आणि पक्षाघात होऊ शकतो. बटाट्यामध्ये दूध, मलई, लोणी यांसारख्या नाशवंत अन्नपदार्थ मिसळल्यास आजारी पडण्याचा शक्यता असते.
पालक: जर पालक योग्य प्रकारे गरम केले नाही तर ते लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स बॅक्टेरियामुळे होणारा लिस्टेरिओसिस रोग होऊ शकतो.
लिस्टेरिओसिस हा एक संसर्ग आहे ज्यामुळे मान ताठ, ताप, डोकेदुखी आणि कधी कधी चक्कर येऊ शकतात. हा जीवाणू अन्नपदार्थांमध्ये असतो.
भात: लोक बरेचदा उरलेला भात गरम करून खातात. बटाटे आणि पालक याच्याप्रमाणे भात पुन्हा गरम करणे देखील टाळले पाहिजे.
कारण भातामध्ये छिद्र असतात, जे उष्णतेला प्रतिरोधक असतात आणि रोगजनकांच्या वाढीस कारणीभूत असतात.
अंडी:अंड्यामध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया असू शकतो, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या, ताप आणि अतिसार होऊ शकतो.
जेव्हा अंडी योग्य तापमानात साठवली जात नाहीत, तेव्हा रोगजंतूंची झपाट्याने वाढ होते. या जीवाणूमुळे विषबाधा होऊ शकते.