Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हैदराबादच्या नवाबांवर चेन्नईच्या किंग्सचा विजय
रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवे याचे वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबादने दिलेले १३५ धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून आरामात पार केले. चेन्नईकडून डेवेन कॉनवे याने नाबाद ७७ धावांची खेळी केली.
हैदराबादने दिलेले १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेन कॉनवे यांनी ८७ धावांची सलामी भागिदारी केली. सलामीची जोडी शतकी भागिदारी करणार असे वाटले तेव्हा दुर्दैवीरित्या ऋतुराज धावबाद झाला. कॉनवेने मारलेला चेंडू थेट स्टम्पला लागला.. त्याआधी चेंडूला गोलंदाजाचा हात लागला होता. त्यामुळे ऋतुराज गायकवाड बाद झाला.
ऋतुराज गायकवाड याने ३५ धावांची खेळी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर चेन्नईने लागोपाठ दोन विकेट गमावल्या. अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडू यांनी प्रत्येकी नऊ धावांचे योगदान दिले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कॉनवेने धावांचा पाऊस पाडला. कॉनेवेने नाबाद ७७ धावांची खेळी केली. मोईन अली ६ धावांवर नाबाद राहिलाय.
कॉनवने पहिल्या चेंडूपासूनच सावध फलंदाजी केली. धावसंख्या कमी असल्यामुळे विकेट न जाऊ देता कॉनवेने एकेरी दुहेरी धावसंख्यवर जास्त भर दिला.. कॉनवेने ५७ चेंडूत ७७ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. कॉनवेच्या दमदार खेळीच्या बळावर चेन्नईने हैदराबादचा सहज पराभव केला.
हैदराबादकडून मार्केंडय याचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. मार्केंडेय याने दोन विकेट घेतल्या. एडन मार्करम याने खेळपट्टी फिरकीला मदत करत असतानाही वेगवान गोलंदाजांनाच चेंडू दिला. धावसंख्या कमी असताना मार्के जानसेन याने तीन षटकात ३७ धावा खरच केल्या. वॉशिंगटन सुंदर, मार्केंडेय यांना लवकर गोलंदाजी दिली नाही. त्यामुळे चेन्नईच्या विकेट पडल्या नाहीत.