Nagraj Manjule : नागराज मंजुळेंकडून 'खाशाबा' सिनेमाची घोषणा, आंतरराष्ट्रीय खेळाडूवर मराठीतील पहिला बायोपिक ठरणार
सध्या मराठी चित्रपटक्षेत्रातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज यांच्याकडून 'खाशाबा जाधव' यांच्या जीवनावर आधारित एक मराठी बायोपिक घेऊन येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'खाशाबा' या सिनेमाचं एक पोस्टर नागराज यांच्यांकडून सोशल सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या सिनेमाटची काही दिवसापूर्वीच नागराज यांनी घोषणा केली होती
आज पर्यंत आपण अनेक भाषेत बायोपिक आल्याचं पाहिलं आहे. पण मराठी चित्रपटक्षेत्रात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर लार्ज स्केलचा चित्रपट बनविण्यात येणारा 'खाशाबा' बहुदा पहिलाच सिनेमा आहे
साधारण गेल्या पाच-सहा वर्षापासून बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याचं पिक आलं होतं. यातील बहुतेक बायोपिक यशस्वीही झाले आहेत. काही वर्षापूर्वी आमिर खानचा खेळावर आधारित 'दंगल' सिनेमा रिलिज झाला होता आणि सुपर हिट ठरला होता. यामध्ये बबिता फोगाटच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास दाखवण्यात आला होता. हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांच्या खूप पसंतीसही उतरला होता. पण 'खसाबा' अस्सल मराठी मातीतील सिनेमा आहे
पण आता कोल्हापूरच्या लाल मातीत आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचा आखाडा गाजवणारे खाशाबा जाधव यांच प्रेरणादायी आयुष्य रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यावं म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेमा बनवणार असल्याची घोषणा केली आहे
नुकतचं नागराज यांचा घर, बंदूक आणि बिर्यानी हा सिनेमा रिलिज झाल्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या हटके सिन्समुळे आणि गाण्यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून आलं. पण अशातच नागराज यांनी मराठमोळ्या खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पहिला बायोपिक बनवणार असल्यामुळे चर्चेत आले आहेत
खाशाबा जाधव हे यांचा कालखंड 1926 ते 1984 असा असून ते एक फ्रिस्टाईल भारतीय कुस्तीपटू होते. त्यांनी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताला आणि महाराष्ट्राला जगभर नावलौकिक मिळवून दिला आहे
देशाला ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकूण देणारे 'खाशाबा' पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 च्या उन्हाळी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिलं होतं. अशी कामगिरी करणारे 'खाशाबा' हे पहिलेच खेळाडू होते. त्यांच्या आधी फक्त भारतीय हॉकी संघाने सांघिक खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळून दिली होती. त्यामुळे खाशाबाचं खेळाचं एक वेगळं महत्त्व आहे
भारत सरकारने आजपासून 23 वर्षापूर्वी म्हणजे 2000 साली 'खाशाबा' यांना कुस्तीमधील अप्रतिम योगदाबद्दल मरणोत्तर 'अर्जुन पुरस्कराने' गौरविण्यात आलं आहे. यावर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 15 जानेवारी रोजी गुगलकडून त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल डूडलच्यामाध्यमातून मानवंदना देण्यात आली होती. अशा प्रतिभावंत, मराठमोळ्या खाशाबा यांचा पहिला बायोपिक सिनेमा बनवला जात आहे
नागराज मंजुळे हे त्यांच्या सिनेमाच्या हटके स्टोरी आणि नवोदित कलाकारामुळे नेहमी चर्चेत असतात. पण आता फॅंन्ड्री, सैराटानंतर फक्त 'खाशाबा' हा तिसरा सिनेमा आहे जो फक्त नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार असल्याचं म्हटलं जातंय. हा सिनेमा झी स्टुडिओचा असून ज्योति देशपांडे आणि नागराज पहिल्यांदाच सिनेमानिमित्त एकत्र काम करणार आहेत. लवकरच भारतीय प्रेक्षकांना एका मोठ्या स्केलच्या पहिला मराठी बायोपिक पाहायला मिळणार आहे