SRH vs RR : राजस्थान-हैदराबाद सामन्यात चहलची पत्नी धनश्रीने वेधलं साऱ्यांचं लक्ष, उत्साहात करत होती राजस्थानला चिअर
राजस्थान विरुद्ध हैदराबाद सामन्यात प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणाऱ्या युझवेंद्रच्या पत्नीने साऱ्यांचच लक्ष वेधलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनश्रीने अगदी जोमात युझवेंद्रच्या राजस्थान संघाला चिअर केलं.
धनश्रीने या वेळीचे फोटोही शेअर केले असून यावेळी तिने युझवेंद्रचा मैदानातील एक फोटोही शेअर केला आहे.
सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती असल्याने मैदानात उत्साहाचं वातावरण होतं.
सामन्याला जाण्यापूर्वी धनश्रीने एका इन्स्टा स्टोरीतून ती शूटनंतर कुठे जाईल? हे गेस करण्यासाठी चाहत्यांना सांगितलं होतं. ज्यानंतर ती थेट मैदानात दिसून आली.
सामना पुण्याच्या एमसीए मैदानात पार पडला.
याआधी देखील धनश्री कायम क्रिकेटला चिअर करत असून टीम इंडियालाही चिअर करताना दिसते.
धनश्री पती युझवेंद्रसोबत अनेकदा रिल्स देखील बनवत असते.
पेशाने डान्सर, कोरियोग्राफर असणाऱ्या धनश्रीचे इन्स्टाग्रावरही अनेक चाहते आहेत.
धनश्री कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं.