Photo Gallery : तुळशीहार गळा कासे पितांबर..! अन् मोदी झाले वारकरी, देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी घेतली पंतप्रधानांची भेट
संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं. यासाठी पुण्यातील देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल, असं म्हणत होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली. देहू देवस्थानचे अध्यक्षांसह सात विश्वस्थ पंतप्रधांना निमंत्रण देण्यासाठी दिल्ली दरबारी गेले होते.
यावेळी मोदींना तुकोबांची पगडी, गाथा, मूर्ती, विना, चिपळी, तुळशीचे हार आणि शाल देत लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. देवस्थान दिलेला सन्मान आणि निमंत्रण मोदींनी स्वीकारलं. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं ते हे माझ्या भाग्यच समजेन, असं म्हणत मोदींनी देहूत येण्याला होकार दिल्याची विश्वस्थांनी माहिती दिली.
पंतप्रधान मोदींना आमंत्रण धाडायला गेलेली ही तुकोबांची दहावी पिढी आहे. तुकोबांची शिकवण घेऊन आत्तापर्यंत या पिढ्यांनी सुरु ठेवलेलं, समाजहिताचं कार्य नक्कीच वाखण्याजोगं असल्याचं मत मोदींनी व्यक्त केलं
तर मन कि बात मध्ये उल्लेख करून, आषाढी वारीचा पायी सोहळा जगभर पोहचविला म्हणून या शिष्टमंडळाने मोदींचे आभार मानले.
या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूनगरीत लवकरच येतील असा विश्वास विश्वस्थांनी व्यक्त केलाय. संपूर्ण दगडात कोरीव काम करून हे मंदिर उभारलेलं आहे. जे आता पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणासाठी प्रतीक्षेत आहे.
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना या शिळा मंदिराची पायाभरणी झाली होती. तेंव्हापासून सुरु असलेल्या कामाला कोरोना काळात चांगली गती मिळाली.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी मार्गांचे भूमिपूजन केल्याबद्दल श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज, वारकरी संप्रदाय आणि भाजप आध्यात्मिक आघाडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन केले.