गुजरातचा विजयी चौकार! लखनौचा 56 धावांनी पराभव
GT vs LSG, IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केलाय. गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केलेय. गुजरातने ११ सामन्यात आठ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App२२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनौला १७१ धावांत रोखले. मोहित शर्माने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले.
साहा आणि गिल यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहित शर्माने भेदक मारा केला. गुजरातने लखनौला आयपीएलमध्ये चौथ्यांदा पराभूत केलेय. गुजरातविरोधात लखनौला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.
गुजरातने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक यांनी ८८ धावांची सलामी दिली. या जोडीने पावरप्लेमध्ये ७२ धावांचा पाऊस पाडला होता. मोहित शर्माने ही जोडी फोडत लखनौला मोठा धक्का दिला.
मोहित शर्माने ४८ धावांवर काइल मेयर्स याला बाद केले. या विकेटनंतर लखनौचा डाव गडगडला.. काइल मेयर्सने ३२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले आहेत. तर क्विंटन डिकॉक याने ७० धावांची खेळी केली. या खेळीत क्विंटन डिकॉक याने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ७० धावांचा पाऊस पाडला.
क्विटन डिकॉक आणि काइल मेयर्स यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. एकही फलंदाजाला तीस धावा करता आल्या नाही. दिपक हुड्डा ११, मार्कस स्टॉयनिस ४, निकोल पूरन ३, आयुष बडोनी २१ धावांवर बाद झाले. कर्णधार कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही.
गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. सुरुवातीला गुजरातच्या गोलंदाजांना लय मिळाली नाही. लखनौच्या सलामी जोडीने गुजरातची गोंदाजी फोडून काढली होती. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातच्या गोलदांजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. ठरावीक अंतारावर विकेट घेतल्या. मोहित शर्माने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहित शर्माने चार षटकात फक्त २९ धावा खऱ्च केल्या. नूर अहमद, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.