Ananya Birla: कोण आहे अनन्या बिर्ला? जाणून घ्या अनन्या बिर्लाविषयी
अनन्या बिर्ला ही कुमार मंगलम बिर्ला यांची मोठी मुलगी आहे, जिने आपल्या वडिलांच्या नाव न वापरता स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफोर्ब्सच्या २०२३ च्या अहवालानुसार, अनन्याचे वडील कुमार मंगलम बिर्ला हे भारतातील नवव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
अनन्या बिर्ला ज्या कुटुंबात जन्माला आली, तिला हवे असते तर ती ऐषोआरामात जगू शकली असती, पण तिने वडिलांशिवाय स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतला आणि आज ती एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे.
अनन्या बिर्लाने युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयात पदवी घेतली आहे.
तिने मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
अनन्या ही एक उद्योजिका आहे जिने स्वतःच्या दोन कंपन्या सुरु केल्या आहेत.
एक कंपनी स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड आणि दुसरी क्युरोकार्टे, या दोन्ही कंपन्या अनन्या बिर्ला हाताळते.
अनन्याचे प्राण्यांवरही खूप प्रेम आहे.अनन्या बिर्ला एक उद्योजिका तसेच गायिका देखील आहे.
अनन्या अनेक फोटो तिच्या सोशल मीडियालवर शेअर करत असते.
अनन्या बिर्ला ही गायिका आणि उद्योजकासोबतच एक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. अनन्या बिर्लाची एकूण संपत्ती सुमारे $13 अब्ज आहे.