IPL 2022 Winner : ये हालो! गुजरातनं कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव, राजस्थानचा 7 विकेट्सनी पराभव
यंदाची आयपीएल 2022 (IPL 2022) गुजरात टायटन्स संघाने दिमाखात जिंकली आहे. अखेरपर्यंत गुणतालिकेत अव्वल राहत गुजरातने विजयश्री मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) 7 गडी राखून विजय मिळवला आहे.
राजस्थानकडून जोस बटलरने केवळ 39 धावांची एकहाती झुंज दिली.
पहिली फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात ठिक झाली होती. पण यशस्वी 22 धावा करुन बाद झाला. यशस्वी नंतर बटलरने संजूसह खेळी सावरण्याचा प्रयत्न केला. पण संजूही 14 धावांवर बाद झाल्यानंतर पडिक्कल 2 धावा करुन तंबूत परतला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या.
गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.
131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या गुजरात संघाने साहा आणि वेड यांना स्वस्तात माघारी धाडलं. पण शुभमनने सुरुवातीपासून डाव सावरण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला.
गिलला कर्णधार हार्दिकने महत्त्वपूर्ण साथ यावेळी दिली.
चहलने पांड्याची महत्त्वाची विकेट घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
पण मिलरने 32 धावांची तुफान खेळी करत गुजरातचा विजय पक्का केला.
अखेर शुभमनने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत विजयश्री संघाला मिळवून दिला. त्याच्या नाबाद 45 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.