Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली 'द एलिफंट विस्परर्स'मधील रघुची भेट; पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appव्याघ्न प्रकल्पाला भेट देण्यासह पंतप्रधानांनी आज 'द एलिफंट विस्फरर्स' या माहितीपटातील जोडप्याची अर्थात बोमन आणि बेलीची आणि रघुची भेट घेतली आहे.
नरेंद्र मोदी यांचे बोमन आणि बेलीसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे,रघूसह बोमन आणि बेली यांना भेटून आनंद झाला.
'द एलिफंट विस्फरर्स' या माहितीपटाला 'ऑस्कर 2023'मध्ये 'डॉक्युमेन्ट्री शॉर्ट फिल्म' या कॅटेगरीमधील पुरस्कार मिळाला होता.
ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाचं शूटिंग तामिळनाडूमधील निलगिरी पर्वतरांगेतील मुदुमलाई व्याघ्न प्रकल्पातील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये झालं आहे.
'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस या कॅम्पमध्ये पाच वर्षे राहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्कर विजेत्या 'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटातील जोडप्याची भेट घेतली आहे.
'ऑस्कर 2023'मध्ये पुरस्कार पटकावल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी या माहितीपटाच्या टीमची भेट घेत त्यांचं अभिनंदनदेखील केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हत्तीसोबतचे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.