Dhruv Jurel in IPL : राजस्थान रॉयल्सचा नवा 'फिनिशर'; अवघ्या 15 चेंडूत 34 धावा, ध्रुव जुरेलच्या दमदार खेळीचं सर्वत्र कौतुक
CSK vs RR, IPL 2023 : राजस्थानच्या (RR) घरच्या मैदानावर रंगलेल्या आयपीएलच्या (IPL 2023) 37 व्या सामन्यात चेन्नई (CSK) संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 32 धावांनी विजय मिळवला. राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानने 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावा केल्या.
या सामन्यात अवघ्या 22 वर्षीय खेळाडूने स्फोटक खेळीनं सर्वांनाचं चक्रावून ठेवलं. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात युवा फलंदाज ध्रुव जुरेलची (Dhruv Jurel) झंझावाती खेळी पाहायला मिळाली.
ध्रुव जुरेलने अवघ्या 15 चेंडूत 34 धावा केल्या. जुरेलने संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी केली.
राजस्थान संघाकडून यशस्वी जैस्वालने 43 चेंडूत सर्वाधिक 77 धावा केल्या. मात्र, ध्रुव जुरेलने दमदार खेळीमुळे करत संघाला वेगाने धावा जमवून दिल्या. शेवटच्या
ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी चेन्नई विरुद्धच्या सामन्यात अवघ्या 20 चेंडूत 48 धावा ठोकल्या.
आयपीएल 2023 च्या 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 32 धावांनी पराभव केला.
या सामन्यातील स्फोटक फलंदाजीमुळे ध्रुव जुरेल 'इलेक्ट्रिक स्ट्राईकर ऑफ द मॅच' ठरला.
राजस्थाननं 20 षटकांत 5 गडी गमावून 202 धावांचं आव्हान दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 170 धावा करता आल्या.