Jiah Khan: जिया खाननं अनेक हिट चित्रपटांमध्ये केलं काम; अक्षय कुमार, बिग बींसारख्या सुपरस्टार्ससोबत शेअर केली स्क्रिन
अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या आत्महत्या प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजियानं वयाच्या 18 व्या वर्षी राम गोपाल वर्मा यांच्या 'निशब्द' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला.
2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या गजनी या चित्रपटात जियानं काम केलं.
2010 मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफुल या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटात तिनं प्रमुख भूमिका साकारली.
हाऊफुल या चित्रपटात तिनं अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.
3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.
जियाच्या मृत्यूनं मनोरंजनसृष्टी हादरली होती. आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गंभीर आरोप केले होते.
जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. राबिया खान यांनी कोर्टाला जियाची बॉलिवूडमधील एन्ट्री, तिची कारकीर्द, आणि सूरज पांचोलीसोबतचे नाते याबद्दल सांगितले होते.