CSK vs PBKS IPL 2023 : रहाणेचं वादळ की शिखर धवनचा झंझावात, संघाला कोण तारणार? चेपॉक स्टेडिअमवर रंगणार सामना
IPL 2023 Match 41, CSK vs PBKS : आज चेन्नई सुपर किंग्स (Chennai Supar Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचेन्नई संघाला गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे पंजाबलाही पराभवाची चव चाखावी लागली. शेवटच्या सामन्यात लखनौ संघाने पंजाबवर विजय मिळवला.
महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्त्वात चेन्नई संघ मैदानावर उतरेल. तर, पंजाबचा कर्णधार शिखर धवनही (Shikhar Dhawan) दुखापतीतून सावरल्यावर पुन्हा खेळताना दिसणार आहे.
चेन्नई संघ आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे तर पंजाबची सहाव्या स्थानावर आहेत. चेपॉक म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमममध्ये आज दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं असल्यानं आज दोन्ही संघ विजय मिळवण्याचा आणि शर्यतीत परतण्याचा प्रयत्न करतील.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आज, 30 एप्रिलला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर पंजाब किंग्स (PBKS) विरोधात मैदानावर उतरणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारल्यानंतर चेन्नई आणि लखनौकडील पराभवानंतर पंजाब आजचा सामना खेळणार आहेत.
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या स्टेडियमवर फिरकीपटूंचं वर्चस्व आहे.
अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळण्याचं प्रमाण जास्त असू शकतं.
गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.
यंदाच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे डॅशिंग फॉर्ममध्ये आहे. तर, पंजाबचा कर्णधार शिखर धवनचीही वादळी खेळी पाहायला मिळाली आहे. आजच्या सामन्यात कुणाची बॅट चालणार हे पाहावं लागणार आहे.