Rain : राज्यात अवकाळीचा कहर, शेती पिकांसह घरांचं मोठं नुकसान
राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर. शेती पिकांचं मठं नुकसान
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.
हाती आलेली पिकं या पावसामुळं आडवी झाली आहेत. मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.
सांगोली तालुक्यातीस वाढेगाव परिसरातील दिघे वस्ती, हजारे वस्ती इंगोले बामणे वस्ती या भागातील वादळी वाऱ्यामुळं अनेक घरावरील पत्रे उडून गेले आहेत.
यामुळं घरातील संसार उपयोगी साहीत्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं आहे. या वादळात विजेचे पोलही पडल्यानं विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
वादळी पावसात घरावरील पत्रे उडून गेल्यानं सगळा संसार उघड्यावर पडला आहे.
आंबा, केळी, द्राक्ष, संत्रा य बागांचे अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.
शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळं जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.