CSK in IPL Final 2023 : होमग्राऊंडवर चेन्नईची गुजरातवर मात, दणदणीत विजयाचं चेपॉकवर फटाक्यांची आतषबाजीसह सेलिब्रेशन
चेपॉक स्टेडिअमवर रंगलेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई संघाने गुजरातवर 15 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विजयासह चेन्नई सुपर किंग्सने थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. धोनीच्या नेतृत्वात पांड्याच्या गुजरातला पराभव स्वीकारावा लागला.
धोनीच्या चेन्नई संघाने घरच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवरील सामना जिंकत आयपीएल 2023 च्या फायनलचं तिकीट मिळवलं आहे.
चेन्नईच्या दमदार विजयानंतर चेपॉक स्टेडिअमवर जोरदार आतषबाजी करत विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आलं.
चेन्नईतील एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडिअम चेन्नई सुपर किंग्स संघाचा बालेकिल्ला मानला जातो.
या घरच्या मैदानासोबत कर्णधार धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स संघाच्या खास आठवणी आहे. हे मैदान नेहमीच धोनी आणि चेन्नई संघासाठी खास राहिलं आहे.
चेन्नई संघाच्या विजयाचा चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
यंदाच्या मोसमातील चेन्नई संघाचा त्यांच्या होमग्राऊंडवरील हा शेवटचा सामना होता. त्यामुळे चेपॉक स्टेडिअमवर आतषबाजी करण्यात आली.
चेन्नईच्या विजयानंतर स्टेडिअममध्ये एकीकडे जोरदार घोषणाबाजी आणि दुसरीकडे आतषबाजी असं दृष्यं पाहायला मिळालं.
धोनी आणि चेन्नई संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर मोठ्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावत संघाचा उत्साह वाढवला. कर्णधार धोनीची पत्नी साक्षीही सामना पाहण्यासाठी पोहोचली होती.
चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्यावेळी संपूर्ण चेपॉक स्टेडिअम जणू पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला होता.
स्टेडिअमवर पिवळ्या रंगाच्या जर्सीमध्ये 'येलो आर्मी' दिसून आली.
चेन्नई आणि धोनीच्या 'सुपर फॅन्स'नं या सामन्यात वेगळा उत्साह आणला होता.