PM Modi in Sydney: पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅन्थनी अल्बनीज यांच्यासोबत मोदी द्विपक्षिय चर्चा करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा आज तिसरा आणि शेवटचा दिवस आहे.
दोन्ही नेत्यांमधील ही एका वर्षातली पाचवी भेट असणार आहे.
पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल डेव्हिड जॉन हर्ले आणि विरोधी पक्ष नेते पीटर डेटन यांची देखील भेट घेणार आहेत
पंतप्रधान मोदींसाठी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी 20 हजार भारतीय नागरिक मोदींना ऐकण्यासाठी जमले होते.
सिडनीत PM मोदींचं वैदिक मंत्रोच्चारासह पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
सिडनीतील कुडोस बँक एरिना (Qudos Bank Arena) येथे वैदिक मंत्रोच्चार आणि इतर पारंपारिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथे स्वागत करण्यात आले.
अहमदाबादमध्ये मला पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचे भारतीय भूमीवर स्वागत करण्याची संधी मिळाली. आज ते येथे लिटिल इंडिया गेटवेच्या पायाभरणीसाठी माझ्यासोबत सामील झाले आहेत. मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असेही मोदी म्हणाले