Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : गुजरातचा 15 धावांनी पराभव करत चेन्नईची अंतिम फेरीत धडक, धोनीचा संघ पाचव्यांदा चॅम्पियन ठरणार?
धोनीच्या चेन्नईनं गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे, तर चेन्नईला 5 वेळा अंतिम फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2008 मध्ये पहिल्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचले, पण चेन्नईला अंतिम फेरीत शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला.
यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघ 20 षटकांत अवघ्या 157 धावांत सर्वबाद झाला.
गुजरात टायटन्सकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. शुभमन गिलने 38 चेंडूत 42 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला.
याशिवाय गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासह इतर फलंदाजांनी निराशा केली. मात्र, राशिद खानने शेवटच्या षटकात 16 चेंडूत 30 धावांची झटपट खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांमध्ये महिशा तिक्षणा, रवींद्र जडेजा आणि महिषा पाथिराना यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडेनं ही एक गडी बाद केला.
या विजयानंतर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, गुजरात टायटन्सला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
आज, 24 मे रोजी (बुधवारी) एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचा संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजयी संघ गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या संघाचा प्रवास संपणार आहे. दरम्यान, या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.