मुंबई इंडियन्सच्या महिला संघाचा सराव सुरु; 4 मार्च रोजी गुजरात जायंट्सला भिडणार
WPL 2023: सध्या क्रीडारसिकांमध्ये उत्सुकता आहे ती आगामी महिला प्रीमियर लीगची. या स्पर्धेचं पहिलावहिला सीझन 4 मार्चपासून सुरु होणार आहे. या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला प्रीमियर लीगचा (WPL) पहिला सीझन 4 मार्चपासून सुरु होणार आहे. हे पाहता आता सर्व संघांच्या खेळाडूंनी आपापल्या फ्रँचायझींसोबत सराव सुरु केला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या महिला संघाच्या सराव शिबिरात बहुतांश खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. (फोटो : Social Media)
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाच्या पहिल्या सराव सत्रात मुख्य प्रशिक्षक शार्लोट एडवर्ड्स यांच्यासह संपूर्ण सपोर्ट स्टाफ उपस्थित होता. याशिवाय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरदेखील उपस्थित होती. (फोटो : Social Media)
कर्णधार हरमनप्रीतशिवाय या संघात हेली मॅथ्यूज आणि नताली सिव्हर ब्रंट यांसारख्या अनेक महत्त्वाच्या दिग्गज खेळाडूंचाही समावेश आहे. (फोटो : Social Media)
4 मार्चपासून सुरु होणाऱ्या महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होणार आहे. (फोटो : Social Media)
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिला सामना 4 मार्च रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे. (फोटो : Social Media)
फँचायझीने पहिल्या सत्रासाठी आपल्या संघाच्या जर्सीचं अनावरण केलं आहे. ज्यामध्ये त्यांच्या पुरुष संघाच्या जर्सीप्रमाणेच त्यात ब्लू आणि गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन दिसलं आहे. भारताची माजी दिग्गज खेळाडू झुलन गोस्वामी संघात मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो : Social Media)