Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati : हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, रात्र काढली रस्त्यावर
नाफेडकडून अमरावती जिल्ह्यात शासकीय हरभरा (Gram) खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहरभरा विकण्यासाठी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रात्र रस्त्यावर काढली.
नाफेडकडून शासकीय हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी आजपासून सुरु होणार आहे. हरभरा विकण्यासाठी धामणगाव रेल्वे शहरात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
काल दुपारपासून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. नाफेडकडून आज सकाळी आठ वाजता शासकीय हरभरा खरेदीची ऑनलाईन नोंदणी होणार आहे.
हरभऱ्याचा हमीभाव हा 5 हजार 300 असल्यानं शेतकऱ्यांनी आत्तापासूनच नोंदणी करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
सध्या शेतकऱ्यांचा हरभरा घरात पडून आहे. बाजारात 4 हजार 200 ते 4 हजार 400 रुपये दर मिळत असल्यानं सगळ्या शेतकऱ्यांचा कल नाफेडकडे आहे.
नाफेडचे हमीभाव हे 5 हजार 300 रुपये असल्याने प्रत्येक शेतकरी आपला हरभरा याठिकाणीच विकण्यासाठी येत आहे.
धामणगाव रेल्वे शहरात नोंदणी केंद्राच्या बाहेर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या नोंदणीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर रात्र जागून काढली
यावर्षी राज्यात एकूण 29 लाख 20 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदा हरभरा पिकासाठी वातावरण देखील चांगले असल्यानं उत्पादनही चांगले निघत आहे.
नाफेडकडून हरभरा खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार आजपासून अमरावती जिल्ह्यात हरभरा खरेदी नोंदणी सुरु झाली आहे.