IPL 2021 : ...अन् CSK च्या स्टार खेळाडूनं गर्लफ्रेंडला मैदानातच घातली लग्नाची मागणी

आयपीएल 2021 मध्ये गुरुवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्सनं चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. पण हा सामना संपल्यानंतर मैदानात एक खास क्षण पाहण्याची संधी सर्वांना मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार गोलंदाज दीपक चाहरनं स्टेडिअममधील स्टँड्समध्ये आपली गर्लफ्रेंड जया भारद्वाजला सर्वांसमोर प्रपोज केलं.

हा क्षण पाहून उपस्थित प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाले होते. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सामना संपताच दीपक चाहर स्टँड्समध्ये गेला आणि आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केला. दीपक चाहरनं गुडघ्यावर बसून आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं.
आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दोघांनाही शुभेच्छा दिल्या. जेव्हा दीपकला जयानं होकार दिला, त्यावेळी दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली.
दीपक चाहरनं हा खास क्षण इंन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. दीपकनं दोन फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, फोटोच सर्वकाही सांगतायत, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवाय.
जया भारद्वाज आणि दीपक चाहर बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दीपक चाहरला चेन्नई सुपर किंग्स, आयपीएल, इतर खेळाडूंसह इतर दिग्गजांनीही शुभेच्छा दिल्या आहेत.