PHOTO : मुंख्यमंत्री ते पंतप्रधान.... Narendra Modi यांच्या राजकीय प्रवासाला 20 वर्षे पूर्ण
नरेंद्र मोदींनी 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाच्या पंतप्रधान पदापर्यंतच्या त्यांच्या या राजकीय प्रवासाला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2001 ते 2014 या दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री होते.
सन 2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड बहुमत मिळवत सत्ता हाती घेतली. त्यावेळी मोदी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान बनले.
सन 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा मोदींच्या हाती देशाची कमान आली.
पंतप्रधान मोदींच्या या प्रवासाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीनं भाजप सेवा समर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
आजपासून 20 वर्षांपूर्वी सुरु झालेली विकास आणि सुशासनाची यात्रा आजही अविरतरपणे सुरु आहे. या काळात मोदींनी देशाच्या जनेतेची सेवा केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या 20 वर्षांच्या काळात मोदींनी जनतेची सेवा केली आणि त्यांचं चरित्र्य निष्कलंक राहिलं असं सांगत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.